जारकरवाडीतील सातजणांवर
मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

जारकरवाडीतील सातजणांवर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

Published on

पारगाव, ता. १८ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी चंद्रकांत बाळू कापडी यांच्या जारकरवाडी येथील वैदवाडी ते कॅनॉल रस्त्यावर घरापासून ते शेतात जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याची तहसीलदारांनी स्थळ पाहणी करून पंचनामा करून दिल्याच्या राग मनात धरून चंद्रकांत बाळू कापडी, अलका कापडी, मुलगा विशाल कापडी यांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (ता. १६) दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घटना घडली आहे.
याप्रकरणी चंद्रकांत कापडी यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी रमेश विश्वनाथ वैद, शांताराम काशिनाथ वैद, विश्वनाथ काशिनाथ वैद, निवृत्ती जगन वैद, सिंधू निवृत्ती वैद, रोहिणी रमेश वैद, आरती अविनाश वैद (सर्व रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) यांच्यावर बेकायदेशीर गर्दी जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जढर करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com