भीमाशंकर कारखान्यास ‘वसंतदादा पाटील’ पुरस्कार
पारगाव, ता. ३ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज ( नवी दिल्ली) यांचा सन २०२३-२४ करिता देशातील ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी (ता.३) २०२३-२४ राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित करून देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री श्रीमती निमुबेन बांभनिया, हरियाणातील ॠषीहूड विद्यापीठाचे कुलपती व माजी केंदीयमंत्री सुरेश प्रभू, हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. अरविंद कुमार शर्मा, उत्तर प्रदेश राज्याचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशातील साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्वीकारला. कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे केली. यामुळे कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पुरस्कार मिळण्यासाठी कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दूरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १६ असे एकूण २९ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” सात वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
05783
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.