पुणे
काठापुरातील ज्येष्ठ पंढरपूरमधून बेपत्ता
पारगाव, ता. ८ : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बाळू बाळा शेटे (वय ६२) हे आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे गेले असता रविवारी (ता. ६) एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथून बेपत्ता (हरवले) झाले आहेत.
याबाबत प्रवीण बाळू शेटे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रवीण यांचे वडील बाळू शेटे हे शनिवारी (ता. ५) गावातील ग्रामस्थांसोबत पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी गेले होते. मात्र, रविवारी (ता. ६) ते महाद्वार घाट पंढरपूर येथून कोणास काही एक न सांगता निघून गेले. नातेवाईक आणि पंढरपूर शहर व आजूबाजूस शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार देण्यात आली. त्यांची उंची सहा फूट असून, रंग गोरा, मध्यम बांधा नाक सरळ आहे. त्यांनी अंगात पांढरा शर्ट व विजार आणि डोक्यावर पांढरी टोपी घातलेली आहे.