पुणे
पारगावच्या पोलिस ठाण्यात गिल यांच्याकडून आरती
पारगाव, ता. २८ : पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्याला भेट देऊन गणपतीची आरती करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्याच्या कामाचा आढावा घेतल्याची माहिती पारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत किती आणि कोणती गावे येतात, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणत्या घडामोडी घडतात, कोणती पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे आहेत याची माहिती घेतल्याचे गंधारे म्हणाले.