फ्लॉवरच्या पहिल्याच तोड्यात सव्वा पाच लाखांचे उत्पन्न

फ्लॉवरच्या पहिल्याच तोड्यात सव्वा पाच लाखांचे उत्पन्न

Published on

पारगाव, ता. ३ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल चंद्रकांत ढोबळे व लोकनियुक्त सरपंच श्वेता किरण ढोबळे या दीर भावजयीने एकूण १५ एकर क्षेत्रात फ्लॉवरचे उत्पादन घेतले आहे. पहिल्या तोड्यातच दोन एकरातून ४५० पिशवी मिळाल्या आहेत. पिकास प्रतिदहा किलोस २३० रुपयांचा बाजारभाव मिळाला. पहिल्याच तोड्याला सव्वा पाच लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले.

ढोबळे हे दीर भावजय सामाजिक कामाबरोबर शेतीही चांगल्या पद्धतीने पाहतात. त्यांनी एकूण १५ एकर क्षेत्रात गादी वाफे करून पाण्यासाठी ठिबक बसवून जुलैच्या पहिला आठवड्यात फ्लॉवरच्या रोपांची लागवड केली. एका एकरसाठी त्यांना १७ हजार रोपे लागली. एक रोप त्यांना एक रुपयाला बसले. लागवडी पूर्वी प्रतिएकरी तीन ट्रॅक्टर ट्रॉली कोंबड खत टाकले. लागवडीनंतर कृषी तज्ज्ञ नानाभाऊ ढोबळे व सुनील दाते यांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक खतांचा डोस दिला. आवश्यकतेनुसार कीटकनाशक औषधांची फवारणी केली. प्रती एकरी ५० हजार रुपये उत्पादन खर्च आला. लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी फ्लावर काढणीला आली.

भाऊ सुरेश चंद्रकांत ढोबळे व किरण चंद्रकांत ढोबळे यांचीही वेळोवेळी मदत होते, असे ढोबळे यांनी सांगितले. दरम्यान, श्वेता ढोबळे या वेळप्रसंगी स्वतः ट्रॅक्टर चालवतात. त्यांच्या शेतात १५ जणांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला आहे.


शेतातच भरला २० टन वजनाचा ट्रक
पहिल्या दोन एकरात ४५० पिशवी उत्पादन निघाले एक पिशवीचे वजन ५० किलो भरते. नीलेश शिंदे व भाऊसाहेब माडीवाले या व्यापाऱ्यांनी शेतात जागेवरच प्रतिदहा किलोला २३० रुपये बाजारभावाने फ्लॉवरची खरेदी केली. संपूर्ण २० टन वजनाचा ट्रक शेतातच फ्लॉवरच्या पिशव्यांनी पूर्ण भरला.

पारगाव गावातील उर्वरित १३ एकर क्षेत्रातून २५०० ते २७०० पिशवी उत्पादन अपेक्षित आहे. बाजारभाव टिकून राहिल्यास सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
- अनिल ढोबळे, अध्यक्ष, यात्रा उत्सव कमिटी, पारगाव

6036

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com