स्वतंत्र आघाडीच्या उदयाचे पडघम
स्वतंत्र आघाडीच्या उदयाचे पडघम
आंबेगाव तालुका पंचायत समितीचे एकूण १० गण आहेत. यावेळेचे सभापतिपद हे सर्वसाधारणसाठी खुले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकाचे दोन दोन वेगवेगळे पक्ष झाले आहे. राज्यातील समीकरणे बदलली आहेत. महायुती असो की महाविकास आघाडी घटकपक्षासह लढतात की स्वबळावर ताकत आजमावतात, हे पहावे लागेल. तालुक्यात आश्चर्यकारकरीत्या वेगळीच आघाडी उदयास येण्याची चर्चाही जोर धरू लागली आहे.
- सुदाम बिडकर, पारगाव
आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या मागील निवडणुकीत एकूण १० पैकी सहा जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंचायत समितीवर वर्चस्व निर्माण केले होते. तर शिवसेनेने तीन सदस्य निवडून आले होते. प्रा. राजाराम बाणखेले हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे नेतृत्व करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आले आहेत. शिवसेनेचे रवींद्र करंजखेले व शीतल तोडकर हे दोन सदस्य आढळराव पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षात आले, तर अलका घोडेकर या देविदास दरेकर यांच्यासोबत शिवसेनेसोबतच राहिल्या. तर अपक्ष सदस्य प्रा. राजाराम बाणखेले हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीसोबत आहे.
तालुक्यात भीमाशंकर साखर कारखाना तसेच बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेले व माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांचे जवळचे समजले जाणारे देवदत्त निकम आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून विरोधी बाजूने आहेत. त्यांनी वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.
यावेळी पंचायत समिती गणांचे आरक्षण बोरघर अनुसूचित जमाती, शिनोली अनुसूचित जमाती महिला, घोडेगाव सर्वसाधारण, पेठ सर्वसाधारण, कळंब ओबीसी महिला, चांडोली बुद्रुक सर्वसाधारण महिला, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक सर्वसाधारण महिला, जारकरवाडी सर्वसाधारण महिला, पिंपळगाव ओबीसी, अवसरी बुद्रुक सर्वसाधारण असे आहे.
मागील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी कॉंग्रेस- ६, शिवसेना- ३, अपक्ष- १.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

