शेवगा ३०० तर सफरचंद १५० रुपये किलो
पारगाव, ता. २०: शेवग्याचे बाजारभाव कडाडल्याने आठवडे बाजारातील तरकारी मालातून शेवग्याची शेंगा गायब झाल्या आहेत. त्या तुलनेने सफरचंद स्वस्त झाले आहे. शेवग्याच्या शेंगा प्रती किलो २०० ते ३०० तर सफरचंद १२५ ते १५० रुपये किलोने मिळू लागले आहे.
सध्या थंडीच्या कडाक्यामुळे आणि परतीच्या पावसामुळे शेवग्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून आवक घटली आहे, परिणामी शेवग्याचे बाजारभाव कडाडले आहेत, किरकोळ बाजारात शेवगा २०० ते ३०० रुपये किलोने मिळत आहे तर घाऊक बाजारात प्रती १० किलोचा २००० ते २७०० रुपये दर मिळत आहेत, त्यामुळे ग्राहकांना महागड्या दराने शेवग्याच्या शेंगा खरेदी कराव्या लागत आहेत.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील आजच्या शनिवारच्या आठवडे बाजारात फक्त एकाच विक्रेत्याकडे शेवगा विक्रीसाठी तोही २०० रुपये किलो म्हणजे ५० रुपये पावशेरमध्ये अवघ्या दोनच शेंगा बसत होत्या. आठवडे बाजारातून शेवगा गायब झाला आहे. सर्वच तरकारी मालाचेही दर ६० ते ८० रुपये प्रती किलो पर्यंत होते, असे अवसरी बुद्रुक येथील तरकारी मालाचे व्यापारी सुनील शिंदे यांनी सांगितले.
शेवग्याच्या तुलनेने पहिले तर सफरचंद स्वस्त झाले असल्याचे फळांचे व्यापारी मंगेश मुळे व संतोष डोळस यांनी सांगितले.
यावर्षी बऱ्याच ठिकाणी परतीचा पाऊस जोरदार झाला त्यामुळे झाडांची फूल गळती झाली त्यामुळे उत्पादनात घट झाली. थंडीचा शेवगा शेंगांच्या वाढीवर परिणाम झाला. सध्या बाजारात गुजरात व राजस्थान मधून शेवगा येत असल्याने वाहतूक खर्च वाढला असल्याने बाजारभावात वाढ झाली असल्याचे पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड येथील शेवग्याचे आडतदार मे. रघुनाथ भिकाजी नवले फर्मचे मंगेश नवले यांनी सांगितले.
06428
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

