रहदारीच्या रस्त्यांबाबत 
मार्ग काढण्याची मागणी

रहदारीच्या रस्त्यांबाबत मार्ग काढण्याची मागणी

Published on

पारगाव, ता. ३० : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील वनविभाग हद्दीतील काही गावातील रहदारीच्या रस्त्यांबाबत आलेल्या अडी-अडचणीवर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जुन्नर उपविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देऊन संबंधित रस्त्यांबाबत चर्चा केली.
आंबेगाव तालुक्यात वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या काठापूर बुद्रुक येथील वैदवाडी- पोंदेवाडी रस्ता ते डिंभा उजवा कालवा रस्ता, लाखणगाव रस्ता ते काकडे- भुमकर वस्ती रस्ता, वैदवाडी- पोंदेवाडी रस्ता ते डिंभा उजवा कालवा (पीर मंदिर मार्गे) रस्ता, लाखणगाव येथे कवठे रस्ता ते पाटील- तागडवस्ती रस्ता, धामणी येथे मधलामळा ते स्मशानभूमी (बाह्यवळण मार्ग), निरगुडसर, बेलसरवाडी येथे स्थानिक शेतकऱ्यांना वनविभाग हद्द निश्चित करणे, लोणी येथून वडगावपीर, मांदळेवाडी गावासाठी वनविभाग परवानगीने विद्युत वाहक खांब उभे करणे, धामणी येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या जलवाहिनीबाबत चर्चा करणे, महाळुंगे पडवळ येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या जलवाहिनीबाबत चर्चा करणे या कामासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक वळसे पाटील यांनी प्रशांत खाडे यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी माजी सभापती संजय गवारी, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, अनिल वाळुंज, निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील, मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, माऊली पाटील, धामणी सरपंच अक्षय विधाटे विशाल करंडे, सुधीर भुमकर, बाळासाहेब करंडे, महिपत टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित रस्त्यांच्या बाबत स्थानिक ग्रामस्थांकडून प्रस्ताव मागवून वरिष्ठ कार्यालयाला पाठवून रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com