

पारगाव, ता. १ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव तहसीलदार कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रेशनकार्ड दुरुस्ती शिबिरामध्ये परिसरातील सुमारे २५० नागरिकांनी सहभाग घेतला.
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या सूचनेनुसार हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये १०० जणांनी नाव दुरुस्तीसाठी आपले अर्ज दाखल केले व रेशनकार्ड नाव वाढविणे व रेशनकार्ड विभक्त करणे या संदर्भात जवळपास ५० ते ६० जणांनी अर्ज केले आहेत. यावेळी सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल पांडुरंग हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, संजय हिंगे, माजी उपसरपंच सचिन हिंगे, अशोक हिंगे, माजी सरपंच संगीता दळवी, रेशन दुकानदार अशोक दळवी, सर्जेराव हिंगे आदी उपस्थित होते.