पहाडदऱ्यातील आदिवासी महिलांना मायेची ऊब
पारगाव, ता. १८ : पहाडदरा (ता. आंबेगाव) येथील ठाकरवाडीतील आदिवासी ठाकर समाजातील महिलांमध्ये जाऊन अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांनी एकूण १५० आदिवासी महिलांना चटईचे मोफत वाटप करून थंडीच्या दिवसात मायेची ऊब दिली आहे.
मकर संक्रातीनंतर महिलांसाठी हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करून महिला आपल्या मैत्रिणी, नातेवाईक महिला यांना हळदी- कुंकवासाठी बोलावून वाण म्हणून वस्तू भेट देतात. अनेकदा वाण म्हणून आलेल्या वस्तू उपयोगी पडत नाहीत. त्यामध्ये बहुतांशी वस्तू प्लॅस्टिकच्या असतात, त्या वस्तू काही दिवसानंतर अडगळीत पडतात, त्याचा उपयोगही होत नाही. मात्र, येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिला गेली चार वर्षापासून दरवर्षी एकत्र येत ठाकरवाडीत जाऊन दुसऱ्यांच्या शेतावर रोजंदारीने कामावर जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांसाठी हळदी- कुंकवाचे आयोजन करतात. याही वर्षी रविवारी (ता. १८) १५० महिलांना थंडीच्या दिवसात उपयोगी पडणाऱ्या चटईचे वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन जोगेश्वरी बचत गटाच्या अध्यक्षा निर्मला बिडकर, सचिव रेश्मा शिंदे, प्रतिभा खेडकर, सुषमा भोर, भाग्यश्री बिडकर, स्वाती पवार, जया शिंदे, राजश्री शिंदे, प्रमिला शिंदे, अर्चना दरेकर, सविता थोरात, राजश्री ढेपे, प्रियांका टेमकर यांनी केले होते. यावेळी धामणीच्या माजी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, पहाडदऱ्याच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सविता वायकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
06516
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

