पोंदेवाडीत गडदादेवीयात्रेत बैलगाडा शर्यत
पारगाव, ता. २७ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील गडदादेवी यात्रा मंगळवार (ता. ३), बुधवार (ता. ४) या दोन दिवशी साजरी होणार असून या निमित्त बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा, संगीत भजनाचा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती यात्रा उत्सव समितीने दिली.
मंगळवारी सकाळी ७ ते १० देवीस हारतुरे, महापूजा, सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यत होणार आहे. विजेत्या प्रथम क्रमांकास ३१ हजार १११ रुपये, व्दितीय क्रमांक २१ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार १११ रुपये, प्रथम फायनलसाठी सात हजार एक रुपये, व्दितीय फायनल पाच हजार एक रुपये, तृतीय फायनल तीन हजार एक रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत वडजादेवी संगीत भजनी मंडळ (ढोबळेवाडी) व गडदादेवी संगीत भजनी मंडळ (पोंदेवाडी) यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी ९ वाजता देवीला चोळी पातळ, शेरणी वाटप, काठी मिरवणूक, दुपारी चार वाजता कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

