नगरपालिकेच्या यशामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह
सुदाम बिडकर : सकाळ वृत्तसेवा
पारगाव, ता. २७ : जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे. या निवडणुकीमध्ये आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील एकूण २४ पैकी १८ जागा लढवत आहे. तर, सहा ठिकाणी स्थानिक पातळीवर इतर मित्र पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीत या तिन्ही तालुक्यातील चारही नगरपरिषदेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान झाल्याने शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे.
आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीन पक्षांची आघाडी असा सामना रंगणार आहे. मागील जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा फक्त एक सदस्य होता. यावेळी शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी एकत्र येत राष्ट्रवादी विरूद्ध आघाडी तयार केली आहे. एकूण पाच जागांपैकी दोन जागा शिवसेना लढवत आहे. घोडेगाव- पेठ गटात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या पत्नी सुवर्णा दरेकर या उमेदवार आहेत, तर पारगाव- जारकरवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीतुन नुकतेच शिवसेनेत आलेले अरुण गिरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी) यांच्या सोबत होणार आहे. दोघांनीही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. तीन ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. कळंब- रांजणी गटात शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात यांच्या पत्नी प्रीती थोरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे.
आमदार शरद सोनवणे यांच्या जुन्नर तालुक्यात आठ जिल्हा परिषद जागा असून, शिवसेनेने सर्वच्या सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे यांना शिवसेनेने खोडद- बोरी गटात उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या सोबत शिवसेना ठाकरे पक्षामधून आलेले मंगेश काकडे यांना आळे- पिंपळवंडी गटात शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. इतर सहा ठिकाणीसुद्धा तगडे उमेदवार उभे केले आहे.
खेड तालुक्यातील आठ पैकी पाच जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेतर तीन जागांवर स्थानिक तडजोडीनुसार मित्रपक्षांना पाठिंबा दिला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीत या तिन्ही तालुक्यातील जुन्नर, मंचर, राजगुरुनगर व चाकण या चारही नगरपरिषदेत थेट जनतेतून शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष निवडुन आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

