लोणीतील कांद्याचे लिलाव बंद .

लोणीतील कांद्याचे लिलाव बंद .

Published on

पारगाव, ता. २८ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांतील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दुसऱ्याही दिवशी बाजारपेठेतील दुकाने बंद करून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. लोणी येथील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार कांद्याचे लिलाव बंद ठेवले होते.
अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, वडगावपीर, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रानमळा, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पारगाव, धामणी, लोणी, खडकवाडी, लाखणगाव आदी गावांच्यासह या भागातील वाड्या वस्त्यावर शोककळा पसरली.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची प्रचाराची धावपळ सुरू झाली असताना पवार यांच्या मृत्यूची बातमी कळाली. त्यामुळे पारगाव-जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना व भाजप या पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार बंद करून अजित पवार यांना आदरांजली वाहिली.
कांद्याचे आडतदार व्यापारी महेंद्र वाळुंज, नितीन नरवडे, संजय भोजने, मच्छिंद्र वाळूंज यांनी आजचे कांद्याचे लिलाव बंद ठेऊन उपबाजार आवारातील आडतदार, बाजार समितीचे कर्मचारी, हमाल मापाडी तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.

06552

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com