धामणीत घुमला मल्लांच्या शड्डुचा आवाज
पारगाव, ता. ३ : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात मल्लांच्या शड्डुचा आवाज घुमला. या आखाड्यात शेवटची मानाची कुस्ती निखिल मच्छिंद्र वाघ (पहाडदरा) विरुद्ध अक्षय खंडागळे (मंचर) या दोघांत झाली. निखिल वाघ याने सलग चौथ्या वर्षी कुस्ती चीतपट करून जिंकली.
पुणे जिल्ह्यातून आलेल्या मल्लांनी चीतपट कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची मने जिंकली. विजेत्या पहिलवांना एकूण ६० हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली. निखिल वाघ यास यात्रा कमिटीच्या वतीने तीन हजार रुपये व वैयक्तिक स्वरूपात १२ हजार रुपये, असे एकूण १५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
उत्तर पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील खंडोबा देवाची यात्रा रविवार (ता. १) व सोमवार (ता. २) उत्साहात पार पडली. सोमवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी ८ ते ११ कलगी तुऱ्याचा कार्यक्रम झाला. यावेळी धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी कुस्त्यांच्या आखाड्यात जिल्ह्यातील देहू, शिक्रापूर, मुळशी, मावळ, शिरूर व पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील तालमीमधील मल्लांनी चमकदार खेळी करून चितपट कुस्त्या केल्या. निकाली कुस्ती करणाऱ्या पहिलवानास ५१ रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत बक्षीसे देण्यात आली. एकूण सुमारे ६० हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली. आखाड्याची व्यवस्था माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, पंढरपूर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर विधाटे, विलास पगारिया, शांताराम जाधव, सरपंच अक्षय विधाटे, सागर जाधव, रेश्मा बोऱ्हाडे, वामन जाधव, पहाडदऱ्याचे उपसरपंच कैलास वाघ यांनी पहिली. पंच म्हणून सुनील जाधव, संजय गाढवे, भरत तांबे, शरद जाधव यांनी काम पाहिले.
06566
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

