काठापूर बुद्रुक येथील शर्यतीत ३२० बैलगाडे
पारगाव, ता. १७ : काठापुर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण एक लाख ५२ हजार रुपये इनाम वाटप करण्यात आला.
येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे- प्रकाश मेचे, रुद्रांश दाते-अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला. प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुद्रांश दाते-बारकू जगताप, नीलेश गाडगे यांनी तर फायनलमध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ, उमेश भोर-नीलेश वाघ यांनी, द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी-राजू जोरी यांनी पटकावला, तृतीय क्रमांक किशोर करंडे- प्रकाश मेचे, कै. तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे, काळुराम टिंगरे, अशोक करंडे, विशाल करंडे, अमोल करंडे, बजरंग करंडे, शिवाजी करंडे, नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले, दत्तात्रय करंडे, किरण करंडे, युवराज हुले यांसह ग्रामस्थांनी पाहिली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

