लोणीत आढळला मृतावस्थेत मोर
पारगाव, ता. २३ : लोणी (ता. आंबेगाव) येथील ओढ्यालगत मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत मोराचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या पोटात प्लॅस्टिक तसेच लोखंडी तारेचे तुकडे आढळून आले आहे.
येथील गावालगत ओढा आहे रविवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता स्वप्नील रामदास सिनलकर शेतात जात असताना त्यांना ओढ्यात मोर मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी वनविभागाला कळवल्यानंतर वनरक्षक योगेश निघोट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृत मोर ताब्यात घेतले. निरगुडसर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तळेकर यांनी सोमवारी (ता.२३) सकाळी शवविच्छेदन केले. यावेळी मोराच्या पोटात प्लॅस्टिक तसेच लोखंडी तारेचे तुकडे आढळून आले आहे. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अवसरी वनउद्यानात शासकीय नियमानुसार मृत मोराचे दहन करण्यात आल्याचे योगेश निघोट यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

