मंगलाष्टक गायकांची मागणी वाढली
पारगाव, ता. ४ : विवाह सोहळ्यांमध्ये अलीकडच्या काही वर्षात पारंपरिक पद्धतीने शुद्ध स्वरात लयबद्ध आणि संगीताच्या साथीने मंगलाष्टके म्हणणाऱ्या गायकांना मागणी वाढली आहे. लग्नसोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लग्नात संगीत रजनीचे आयोजन करण्याकडे कार्यालय मालकांचा कल वाढल्याने ग्रामीण भागातील गायक तसेच वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्न म्हणजे वधूवरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो.
चित्रपट-मालिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यात आता विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्यात संगीत सोहळा. लक्षवेधी ठरत आहे. लग्नसोहळ्याचा आनंद आपल्या मित्र-मैत्रीण आणि नातेवाइकांसोबतच द्विगुणित करतात. लग्नाच्या अगोदर हळद, साखरपुडा सोहळा ते विवाहविधीच्या मुहूर्तापर्यंत त्यानंतर वऱ्हाडी मंडळींच्या करमणुकीसाठी संगीत रजनीचे आयोजन केले जाते. म्हणजेच धमाल, मस्ती, नृत्य अशा विविध पद्धतीने हा संगीत सोहळा रंगतोय. यामुळे गायक तसेच वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांच्या गायन पार्टीला मागणी वाढली आहे.
उमेश शिंदे, पांडुरंग गायकवाड, श्रीराम गाडेकर, साहेबराव आल्हाट, महेश शिंगोटे यांच्या गायन पथकाला या लग्नसराईत १५ तारखांचे बुकिंग झाले असून एका लग्न सोहळ्याचे पाच ते दहा हजार रुपये मिळत असल्याचे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गायक उमेश शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

