

पारगाव, ता. २ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे संबंधित विभागाच्या वतीने पंचनामे सुरु केले असून, नुकसान भरपाईसंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करून संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील देवगाव, लाखणगाव पोंदेवाडी, वाळुंजनगर खडकवाडी, धुमाळस्थळ या भागातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन गुरुवारी वळसे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार डॉ. सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी काल बुधवारी रात्री गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली होती.
२० मेंढरांचा मृत्यू
वाळुंजनगर येथील कैलास शंकर वाळुंज व पंढरीनाथ दत्तू आदक या दोन शेतकऱ्यांची मेंढरे माळरानावर चरत असताना अचानक जोरात गारपीट सुरु झाली. गारांच्या माऱ्याने एकूण लहान- मोठ्या २० मेंढरांचा मृत्यू झाल्याने या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.