

पारगाव, ता. १५ : रस्ते अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी पारगाव कारखाना पोलिस ठाणे हद्दीतील धोकादायक विहिरींना संरक्षक जाळ्या व कठडे बसवण्याची विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
नाशिकमधील दिंडोरी येथे विहिरीत गाडी कोसळून झालेल्या नऊ जणांच्या मृत्यूनंतर पुणे जिल्ह्यात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावठाण ते लोखंडे मळा रस्त्यावरील एक विहीर अपघाताचे केंद्र बनली होती. या रस्त्यावरून शाळकरी मुले आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. विहिरीला कठडे नसल्याने येथे अपघाताची भीती व्यक्त करत माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे व काळुराम लोखंडे यांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. याची दखल घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी विहीर मालक सुभाष लोखंडे यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, लोखंडे यांनी विहिरीला लोखंडी जाळी आणि परावर्तक बसवून रस्ता सुरक्षित केला आहे. परिसरातील इतर विहीर मालकांनीही अशाच प्रकारे सुरक्षा व्यवस्था करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रस्त्यालगत धोकादायक असलेल्या विहीर मालकांनी दुर्घटना टाळण्यासाठी विहिरीला संरक्षक कठडे, लोखंडी जाळी तसेच परावर्तक (रिफ्लेक्टर) बसवावे असे आवाहन केले आहे.
- सचिन कांडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक
06866
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.