भीमाशंकर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

भीमाशंकर कारखान्याच्या 
मिल रोलरचे पूजन
Published on

पारगाव, ता. १९ : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी देखभाल दुरुस्ती करून व मिल रोलरचे पूजन रविवारी (ता. १९) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते करून प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंद शिंदे आदींसह कामगार उपस्थित होते. बाळासाहेब बेंडे म्हणाले, कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरू झाली आहे. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कारखान्याचे संस्थापक - संचालक तसेच माजी सहकार मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक पुर्तता करण्यात आली आहे. ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणाऱ्या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, ''''येणारा गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळितास द्यावा''''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com