

पारगाव, ता. २२ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील विकास सोसायटीने ४९५ सभासदांना पुणे जिल्हा बँकेमार्फत खरीप हंगामासाठी ४ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले. मात्र, कर्जमाफीच्या शासन निर्णयाअभावी वसुलीवर परिणाम झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे परिपत्रक अद्याप सोसायट्यांना न मिळाल्याने सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे संस्थेच्या वसुलीच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. शासनाने या योजनेचे परिपत्रक तातडीने जाहीर करावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष खंडू भोजने व उपाध्यक्ष बाळासाहेब लबडे यांनी केली आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्जवाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, विकास अधिकारी के. आर. वाळुंज, सचिव नवनाथ मंचरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.