क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे घराच्या भिंतींना तडे
प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा शेतकऱ्याचा इशारा

क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे घराच्या भिंतींना तडे प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा शेतकऱ्याचा इशारा

आपटाळे, ता. २२ : माणिकडोह (ता. जुन्नर) येथे असणाऱ्या खडी स्टोन क्रशरमुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या क्रशरमुळे जगणे असह्य झाल्याची असल्याची भावना स्थानिक शेतकरी जगदीश ढोबळे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. तर तत्काळ प्रशासनाने याची दखल न घेतल्यास कुटुंबीयांसह उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गावच्या हद्दीत अनेक खडी स्टोन क्रशर आहेत. येथे दगड फोडण्याकरिता मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करण्यात येत आहे. ब्लास्टिंगच्या हादऱ्याने येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या घरांना तडे जाण्याचे प्रकार घडत आहेत. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीलादेखील तडे गेल्याने नुकसान झाले आहे. येथे सतत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे जगदीश ढोबळे व योगेश कबाडी यांनी सांगितले.

स्थानिक शेतकऱ्यांचे याबाबतचे तक्रारअर्ज ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाले आहे. त्यानुसार दोनवेळा ग्रामसभेत कार्यवाही करण्याचा ठराव घेण्यात आला. क्रशरबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी महसूल प्रशासनाकडे केली. मात्र याबाबत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनच सहकार्य करत नसेल तर प्रश्न सुटणार तरी कसे?
- अविनाश ढोबळे, उपसरपंच, माणिकडोह

माणिकडोह (ता. जुन्नर) : खडी स्टोन क्रशरच्या सतत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जगदीश ढोबळे यांच्या घराच्या भिंतींना गेलेले तडे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com