जुन्नरमध्ये ७ ठिकाणी १७ मतदान केंद्र

जुन्नरमध्ये ७ ठिकाणी १७ मतदान केंद्र

आपटाळे, ता. २९ : जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया रविवारी (ता. ३०) तालुक्यात सात ठिकाणी एकूण १७ मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे ९५६, ग्रामपंचायतीचे ११०४, व्यापारी गटातून १०२६; तर हमाल मापाडी गटातून १७८, असे एकूण ३२६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील इंग्रजी माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा आपटाळे, जिल्हा परिषद शाळा वडज, जिल्हा परिषद शाळा नारायणगाव, जिल्हा परिषद शाळा ओतूर, जिल्हा परिषद शाळा पिंपळवंडी, जिल्हा परिषद शाळा बेल्हे येथे त्या परिसरातील विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायत या संस्थांच्या प्रतिनिधींना मतदान करता येणार आहे. तसेच, शंकरराव बुट्टे पाटील इंग्रजी माध्यमिक विद्यालय जुन्नर येथील मतदान केंद्र क्र ३ व ४ मध्ये अडते व व्यापारी मतदार संघाचे मतदान घेण्यात येणार आहे. तर, केंद्र क्रमांक ५ मध्ये हमाल व मापाडी मतदार संघाचे मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी रविवारी (ता. ३०) सांयकाळी पाच वाजता जुन्नर येथील कोंडाजी बाबा डेरे आश्रम येथे पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com