

आपटाळे, ता. ३ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सुराळे, बेलसर, निरगुडे, काले, येणेरे, इंगळून, घाटघर, अंजनावळे, खामगाव, माणिकडोह, कुसूर, पिंपळगाव सिद्धनाथ आदी भागात बैलपोळा सण धामधुमीत साजरा करण्यात आला.
बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करणारा सण असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी सकाळपासूनच जुन्नर येथील मुख्य बाजारपेठेत बैलपोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. तर घरात बैलांच्या प्रतीकात्मक पूजेसाठी देखील बाजारात बैलांची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. निरगुडे, काले , येणेरे येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला. येथील मारुती मंदिराच्या लहान व अरुंद गाभाऱ्यातून बैलांना देवाच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याची पारंपारिक प्रथा असून नागरिकांनी बैल पोळ्याची मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली अशी माहिती ग्रामस्थ विश्वास रोकडे यांनी दिली. सायंकाळी ७ च्या सुमारास गावातून ढोल ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
02209
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.