

आपटाळे, ता. ३ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात कांदा लागवडीच्या कामांना वेग आला असून, बहुतांशी ठिकाणी कांदा लागवडीच्या कामात शेतकरी व्यग्र आहेत.
सध्या कांद्याच्या बाजारभावात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांदा लागवडीचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कांदा रोपाची टंचाई, रोपांचे वाढते दर, मजूर टंचाई, खतांचे वाढलेले बाजारभाव यामुळे उत्पादक हैराण झाला आहे.
कांद्याचे बाजारभावात दिवसेंदिवस चढ उतार होत असले तरी एक शाश्वत उत्पन्नाची हमी म्हणून शेतकरी कांदा पिकाची लागवड करीत आहेत. एकूणच सद्याच्या कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती आगामी काळात अशीच राहिली तर ठीक नाहीतर पुन्हा एकदा बळीराजाच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे.
कांदा पिकाचे उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवून शेतकऱ्यांना नशिबाची परीक्षा आजमावावी लागत आहे. .
खतांच्या किमतीत देखील भरपूर वाढ झाली आहे. तसेच कांद्याच्या रोपांची किमती वाढलेल्या आहेत. हे कुठे कमी की काय तर शेतकऱ्यांना सध्या मजूर टंचाई चा प्रश्न भेडसावत आहे. सकाळी दहा ते पाच या वेळेसाठी तब्बल एका माजुरामागे पाचशे ते सातशे रुपये बळीराजाला मोजावे लागत आहेत.
- महेंद्र भगत,कांदा उत्पादक, कुसूर
सध्या दोन दिवस ढगाळ हवामान असल्याने याचा परिणाम नव्याने लागवड केलेल्या कांदा पिकावर होण्याची शक्यता आहे तर अद्याप लागवड योग्य न झालेली कांदा रोपे देखील यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे.
- मनेष बुट्टे पाटील, कांदा उत्पादक, पाडळी
02303
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.