शिवनेरीवर शिवभक्तांसाठी बारा आरोग्य पथकांची सेवा
आपटाळे, ता. १९ : शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर बुधवारी (ता. १९) गर्दी केली होती. त्यांच्यासाठी जुन्नर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने एकूण बारा आरोग्य पथकांची नियुक्ती केली होती.
मंगळवारपासूनच शिवभक्तांची किल्ले शिवनेरीवर दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती. या शिवभक्तांना किल्ले शिवनेरी गड चढण करताना आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जुन्नर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पथकांची नियुक्ती केली होती. आरोग्य विभागाच्या वतीने शिवजन्मस्थळ, शिवाई मंदिर परिसर, शिवनेरी पायथा, दत्त मंदिर परिसर, दत्त मंदिर ते तलाखी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, कोंडाजी बाबा डेरे आश्रम व हेलिपॅड परिसर या ठिकाणी एकूण बारा पथकांची नियुक्ती केली होती. प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी व आठ कर्मचारी शिवभक्तांच्या सेवेसाठी होते. यावेळी पथकांकडून शिवभक्तांना प्रथमोपचार, तसेच आवश्यक औषधे व गोळ्यांचे वाटप केले. या सेवेचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी आरोग्य पथकाला भेट देऊन माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

