अखेर जुन्नरला मिळाला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी
आपटाळे, ता. १० : जुन्नर तालुक्याची पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी पदाची प्रतीक्षा अखेर संपली असून तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदाची सूत्रे अशोक लांडे यांनी बुधवारी (ता. ९) स्वीकारली. जुन्नरच्या गट शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्याकडे होता.
पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी लांडे यांनी सोमतवाडी (ता. जुन्नर) येथील ठाकरवाडी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन कामकाजाला सुरुवात केली. यावेळी लांडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी माहिती घेत वाचन, लेखन तपासले. जुन्नर तालुका पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत तालुक्यात ३४९ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या तालुक्यात पेसा अंतर्गत दुर्गम भागात ७४ प्राथमिक शाळा आहेत.
तालुक्याला गेले नऊ वर्षे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नव्हता. बाळासाहेब राक्षे हे २०१४ ते २०१६ या कालावधीत पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी होते. त्यानंतर के. डी. भुजबळ, पी. एस. मेमाणे, के. बी. खोडदे, ए. डी. शिंदे या विस्तार अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची धुरा सांभाळली. तर मार्च २०२५ मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून अमोल जंगले यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता.
लांडे हे गोंदिया येथे जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. मूळचे जुन्नरच्या घाटघरचे असलेल्या लांडे यापूर्वी काळात जुन्नर पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी, जुन्नर व शिरूर नगर परिषदेत प्रशासन अधिकारी म्हणून कामकाज केले आहे. तालुक्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी लांडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.