जुन्नरला शिवाई देवी संस्थेत अपहाराचा आरोप

जुन्नरला शिवाई देवी संस्थेत अपहाराचा आरोप

Published on

आपटाळे, ता. १८ : जुन्नर शहरातील शिवाई देवी यात्रा कमिटीच्या माध्यमातून उत्सवाचे आयोजन करणाऱ्या शिवाई देवी सेवा संस्थेमध्ये अनागोंदी कारभार आणि पन्नास लाखांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत संस्थेच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी यात्रेचा हिशोब नागरिकांपुढे मांडावा. अशी मागणी करत हिशोब न मांडल्यास उपोषणाचा इशारा यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष अनिल रोकडे यांनी दिला आहे. जुन्नर येथे मंगळवारी (ता. १५) रोकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले.
यावेळी रोकडे म्हणाले, ‘‘जुन्नर शहरात २००१ पासून शिवाई देवी यात्रेचे आयोजन केले जाते. २०१३ पासून यात्रेच्या खर्चासाठी जुन्नर शहरातून वर्गणीच्या स्वरूपात देणगी गोळा केली जाते. ही जमा झालेली सर्व वर्गणी राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करणे आवश्यक असताना अध्यक्ष श्याम खोत यांनी ही रक्कम पतसंस्थेत ठेवली. यात्रा कमिटीच्या शिल्लक ठेवी या यात्रा कमिटीचे काही सदस्य, माजी अध्यक्ष यांच्या वैयक्तिक नावाने पतसंस्थेत ठेवण्यात नाही.’’
रोकडे २०१८ मध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष असताना सुमारे सतरा लाख रुपये वर्गणी गोळा झाली होती. त्यावेळी सर्व खर्च वजा जाता शिल्लक रकमेचा अद्याप कोणताही हिशोब देण्यात आला नाही. तसेच यात्रा कमिटीने धर्मादाय आयुक्तांकडे २०१५ पासून अद्यापपर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे रोकडे यांनी सांगितले. जुन्नर मधील धान्य बाजार येथील संकुलाच्या मागे यात्रा कमिटीने उभारलेले पत्रा शेड अवैध असल्याची नोटीस नगरपालिकेने दिल्याने या शेडसाठी करण्यात आलेल्या खर्चाला यात्रा कमिटी जबाबदार आहे. शिवाई देवी सेवा संस्था संचलित शिवाई यात्रा कमिटीने आत्तापर्यंतचा हिशोब तीस दिवसांच्या मुदतीत वर्गणीदार जुन्नरकर जनतेसमोर ठेवावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा रोकडे यांनी दिला. यावेळी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष विनायक गोसावी, रवी खिलारी, सचिन तांबोळी, रूपेश जगताप, सूरज नानावटी, संजय वऱ्हाडी, ओंकार जोशी, प्रशांत केदारी, वैभव कापसे, रोहित परदेशी उपस्थित होते.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्याम खोत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हे सर्व आरोप बिनबुडाचे असून वैयक्तिक आकसापोटी केलेले आहेत. याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com