मानव-बिबट संघर्षाचे बारवला देखाव्यातून दर्शन

मानव-बिबट संघर्षाचे बारवला देखाव्यातून दर्शन

Published on

मानव-बिबट संघर्षाचे बारवला देखाव्यातून दर्शन

आपटाळे, ता. ३१ : बारव (ता. जुन्नर) येथील अमित हेजिब यांनी गणेशोत्सवानिमित्ताने घरगुती गणपतीत मानव बिबट संघर्षाची हकिकत देखाव्याच्या निमित्ताने दाखविली आहे. त्यांच्या या देखाव्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
आजमितीस जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी सामाजिक समस्या म्हणून मानव बिबट संघर्ष या समस्येकडे पाहिले जाते. मानव बिबट संघर्ष ही परिस्थिती का निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवरील कारणमिमांसा हेजिब यांनी घरगुती गणपती जवळ देखाव्याच्या स्वरूपात मांडली आहे. यातून त्यांनी जंगलतोड मुळे अन्न आणि निवाऱ्यासाठी बिबट्या मानवी वस्तीत आला. तिथून तो जुन्नर शहरांत दाखल झाला. त्याला पकडून बिबट निवारा केंद्रमध्ये सोडण्यात आले. पुन्हा त्याची तिथून रवानगी जंगलात केली अशा स्वरूपाचे बिबट चक्र मांडण्याचा हेजिब यांनी प्रयत्न केला आहे. त्यातून त्यांनी निसर्ग संवर्धन करून मानव बिबट संघर्ष कमी करता येऊ शकतो असा संदेश दिला आहे.

02664

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com