वृत्तपत्र विक्रीतून बसविली संसाराची घडी
आपटाळे, ता. १४ : घरी इनमीन तीन एकर जमीन, चार भावंडांचे मोठे कुटुंब, कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर करणं परवडत नव्हते म्हणून संसाराचा गाडा ओढण्यासाठी शेतीला जोड व्यवसाय असावा या उद्देशाने जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील संजय दत्तात्रेय ढोमसे यांनी सन २००४ साली वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. गेल्या २१ वर्षांपेक्षा अधिक काळापासून कठोर मेहनत, शिस्त, चिकाटी व पत्नी, मुलाची साथ या जोरावर ढोमसे यांना वृत्तपत्र विक्री व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्यात यश आले आहे.
ढोमसे यांना या व्यवसायात पत्नी प्रमिला व मुलगा ओंकार याचा मोलाचा हातभार लागत आहे. ढोमसे यांचे एक अपत्य हे अपंग होते, त्या मुलाच्या दवाखान्याचा खर्च भागविण्यास देखील ढोमसे यांना या व्यवसायाची मोठी मदत झाली. २०११साली त्यांच्या मुलाचे अपंगत्वामुळे निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख पचवत पत्नी प्रमिला यांनी ढोमसे यांना व्यवसायात खांद्याला खांदा लावून मदत केली. त्यांचा दुसरा मुलगा ओंकार हा इयत्ता सहावीच्या वर्गात असल्यापासून ढोमसे यांना या व्यवसायात मदत करत होता. ओंकार ने ॲनिमेशन मध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली असून पुणे येथे नोकरी करत आहे. ओंकार च्या उच्चशिक्षणात ढोमसे यांना वृत्तपत्र विक्री व्यवसायाचा मोठा फायदा झाला.
02774
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.