मद्यधुंद युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मद्यधुंद युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published on

जुन्नर, ता. २६ : शहरातील पंचलिंग वस्तीमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने आईला धक्काबुकी करून स्वतःच्या हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या मद्यपी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आकाश संजय कोळेकर (वय २०) असे या युवकाचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर शहरातील पंचलिंग वस्तीमध्ये मंगळवारी रात्री आठच्या सुमारास आकाशने मद्यपान करून आईला धक्काबुक्की केली. तसेच तो रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरडा करून स्थानिकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याकडे नेत असताना त्याने जवळ असलेल्या ब्लेडने स्वतःच्या डाव्या हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com