चिन्ह पोचविण्यासाठी  
अपक्षांसाठी कसरत

चिन्ह पोचविण्यासाठी अपक्षांसाठी कसरत

Published on

जुन्नर, ता. २६ : जुन्नर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांना बुधवारी (ता. २६) चिन्ह वाटप करण्यात आले. प्रचाराची सांगता रविवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यातून अपक्ष उमेदवारांना मतदारांपर्यंत निवडणुकीचे चिन्ह पोहोचविण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी भेटणार आहे. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जुन्नर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे विविध पक्षांकडून, तर चार उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. नगरसेवकांच्या दहा प्रभागांसाठी असलेल्या एकूण वीस जागांसाठी ६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी साठ उमेदवार हे विविध पक्षांच्या तिकिटावर, तर नऊ उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकूणच अपक्ष उमेदवारांमध्ये चिन्ह उशिरा भेटल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना संपूर्ण शहरातील व अपक्ष नगरसेवकांना प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत निवडणुकीचे चिन्ह पोहोचविण्यासाठी कालावधी कमी मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com