‘जुन्नरचा सर्वांगीण 
विकास करणार’

‘जुन्नरचा सर्वांगीण विकास करणार’

Published on

जुन्नर, ता. २८ : ‘‘बारामती शहराप्रमाणे जुन्नर शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत केली जाईल,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जुन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, पांडुरंग पवार, उज्ज्वला शेवाळे, धनराज खोत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्नेहल खोत आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘महिलांना लाडक्या बहीण योजनेद्वारे सन्मान मिळवून देण्याचे काम केले आहे. जुन्नर तालुक्यात मानव बिबट संघर्ष चिंताजनक झाला असून, त्यासाठी तातडीने अकरा कोटी रुपये निधी दिला आहे. त्यासह अन्य आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून निधी दिला जात आहे. माजी आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्यातून जुन्नर शहरात जवळपास ११६ कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी दिला जातो, त्या निधीचा वापर योग्य व्हायला हवा व कामाचा दर्जा चांगला असायला हवा.’’
यावेळी जुन्नरचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम, माजी नगरसेवक सुनील ढोबळे, शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेश बारवे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com