ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या अपघातात एकाचा मृत्यू
जुन्नर, ता २९ : अलदरे येथील मानकरवाडी वस्तीमधील एकाचा ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२९) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अनिल बाबूराव मानकर (वय ४५) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गौतम दिनकर मानकर यांनी या घटनेची खबर जुन्नर पोलिस ठाण्यात दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मानकर हे शेतात काम करत असताना दुपारी अडीचच्या सुमारास शेतामध्ये ट्रॅक्टर रोटाव्हेटरचा अपघातात होऊन जखमी अवस्थेत शेतात पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळीहून उपस्थितांनी त्यांना जुन्नर येथे सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

