ठाकरवाडी- तेजूर, ओतूरची लेझीममध्ये बाजी

ठाकरवाडी- तेजूर, ओतूरची लेझीममध्ये बाजी

Published on

जुन्नर, ता. १६ : खानापूर (ता. जुन्नर) येथील शिवनेरी फाऊंडेशन येथे मंगळवार (ता. ९) व बुधवारी (ता. १०) तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव झाला. या महोत्सवात लेझीम स्पर्धेत मुलींच्या मोठ्या गटामध्ये प्राथमिक शाळा ठाकरवाडी तेजूर तर लहान गटात ओतूर नंबर एक या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, संस्थेचे सचिव शुभंकर कणसे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा कणसे, कॅम्पस इन्चार्ज राजेंद्र मुरादे, प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर पटाडे, मुख्याध्यापक संजय मिश्रा, प्रा. अमोल थोरात आदी उपस्थित होते. स्पर्धा पार पाडण्यासाठी जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेने सहकार्य केले.

स्पर्धेतील गट व प्रकारनिहाय प्रथम तीन क्रमांकाचे विजेते अनुक्रमे
मुले-मुली सांघिक
आट्या पाट्या- मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी)- चिंचोली, इंगळूण, गोळेगाव.
कबड्डी- मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी)- गुंजाळवाडी, दातखिळेवाडी.
खो खो- लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवी)- आळे नं. तीन, साकोरी. मोठा गट (इयत्ता सहावी ते आठवी)- गुंजाळवाडी, वसईवाडी .
लेझीम- लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी)- ओतूर नं एक, शिरोली पूर, पिंपळवंडी. मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी)- बोरी खुर्द, इंगळूण.
भजन- लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी)- फांगुळगव्हाण, कळमजाई, भोरवाडी. मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी)- धामणखेल, फांगुळगव्हाण, बोरी खुर्द.
पोवाडा गायन - (मराठी) -वेदिका कोंडे (धामणखेल), कादंबरी टकले (आनंदवाडी), आंबोली.
कव्वाली गायन - (उर्दू) नारायणगाव नं तीन, (चिंचोली मराठी).
लोकनृत्य - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) आर्वी, ओतूर नं दोन, भोसलेवाडी. मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) (चिंचोली मराठी), हिवरे खुर्द, आळेफाटा.
वैयक्तिक
गायन - लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवी)- काव्या लांघी, पूर्वा ठक्कर, शरण्या जगताप. मोठा गट (इयत्ता सहावी ते आठवी)
शर्मिला जाधव, हुमेरा शेख, केतन शिंदे.

मुली सांघिक
आट्या पाट्या- मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी)- चिंचोली (मराठी), इंगळूण, गोळेगाव.
कबड्डी - मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) गुंजाळवाडी, तांबे.
खो- खो - लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवी) वसईवाडी, गोद्रे. मोठा गट (इयत्ता सहावी ते आठवी) गुंजाळवाडी, वसईवाडी.
लेझीम - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) ओतूर नं. दोन, आर्वी, पिंपळवंडी. मोठा गट ठाकरवाडी- तेजूर, मांजरवाडी, खामगाव.
लंगडी - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) आलमे, मढ. मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - गुंजाळवाडी , पिंपळगाव जोगा.

मुले- मुली वैयक्तिक स्पर्धा -
थाळी फेक मोठा गट (इयत्ता सहावी ते आठवी) - ध्रुव कदम (हिवरे तर्फे नारायणगाव), साहिल सिद्दिकी (धनगरवाडी), सत्यप्रकाश यादव (राजुरी).
लांब उडी धावती- लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - शुभम जाधव (आळे), संजय पवार (आगर), श्लोक बांगर (रानमळा). मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - साहिल सिद्दिकी (धनगरवाडी), सत्यप्रकाश यादव (राजुरी), ओम मधे (गुळुंचवाडी).
उंच उडी धावती - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - संवेद शिंदे (बोरी बुद्रुक), हर्षद हिलम (गोळेगाव) श्वेत घोडे, (चौधरपट). मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - राम गुळवे (गुंजाळवाडी), आयु मोहरे (आंबोली), आयुष नेहरकर (माळवाडी).
गोळा फेक - मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - सत्यप्रकाश यादव (राजुरी), ध्रुव कदम (हिवरे तर्फे नारायणगाव), वेदांत रावते (घंगाळदरे).
१०० मीटर धावणे - मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) -
सत्यप्रकाश यादव (राजुरी), श्रेयस शिंदे (वारूळवाडी), साहिल सिद्दिकी (धनगरवाडी).
५० मीटर धावणे लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - शुभम जाधव (आळे), विघ्नेश सांगडे (खडकुंबे), कुणाल घोगरे (अलदरे).
वेशभूषा - लहान गट (इयत्ता पहिली ते दुसरी) - सेजल भागवत (खानगाव), विभुम घोलप (ओतूर नं. एक), विघ्नेश भोर (भोरवाडी),
बेडूक उडी - लहान गट (इयत्ता पहिली ते दुसरी) - सत्यम चव्हाण (आळे), अनिरुद्ध लोहकरे (गवारवाडी), मयांक जाधव ठाकरवाडी (खानगाव), श्रावण गोफणे (रामोसवाडी )
लिंबू चमचा - लहान गट (इयत्ता पहिली ते दुसरी) - साई गायकवाड (नेतवड), तनिष औटी (पिंपळझाप), स्वराज लष्करे (वैशाखखेडे).
बुद्धिबळ लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - रुद्र कोल्हाळ (आपटाळे ), राजवर्धन सुपेकर (ओतूर नं. एक), मल्हार निमसे (निमसेमळा). मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी)
निखिल बाटे (झाप), गौरव चौधरी (खामुंडी), राघव वर्पे (शिरोली बुद्रुक)
बडबड गीते (इयत्ता पहिली ते दुसरी)
पौर्णिमा लांडे (अंजनावळे), देवांशी फुलसुंदर (तोतरबेट), माही कसबे (वडगाव आनंद).
कविता गायन - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - अंजनावळे, पारगाव तर्फे आळे, तोतरबेट. मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - धामणखेल, आळेफाटा, नारायणगाव नं. दोन.
मल्लखांब - मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - हिवरे तर्फे नारायणगाव, इंगळूण, चिंचोली (मराठी)
प्रश्नमंजूषा - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - ओतूर नं. एक, निमगाव सावा, तोतरबेट. मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - आळेफाटा, नगदवाडी, गोळेगाव.
वक्तृत्व - लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवी)- मनस्वी खिलारी (शिंदे), अक्षरा नवले (कांदळी), श्रीराज पन्हाळे (आळेफाटा). मोठा गट (इयत्ता सहावी ते आठवी) - ऋतुजा जामदार (गोळेगाव), जिक्रा शेख (हिवरे खुर्द), वैष्णवी कोळी (पाडळी).

मुली
थाळी फेक - मोठा गट (इयत्ता सहावी ते आठवी) - मेघा राजपूत (चिंचोली मराठी), संजना केदार (ठाकरवाडी- तेजूर) पायल भरवाड ( धनगरवाडी)
लांब उडी धावती - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - श्राव्या विघे (वारूळवाडी), आदिती साबळे (निमगिरी), रितिका पटले (धनगरवाडी). मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - सृष्टी मोहरे (पाडळी), सचित्रा हिले (पिंपळगाव जोगा), पौर्णिमा कोतवाल (गुळुंचवाडी).
उंच उडी धावती - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - रंजना चव्हाण (नगदवाडी), स्वरा मुंढे (मुंढेवाडी), धनश्री चौधरी (उंब्रज नं. एक). मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - तनया सरजीने (आलदरे), सान्वी ताजने (आळेफाटा), धनश्री मोरे (पिंपळगाव जोगा).
गोळा फेक - मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - तनुजा गावडे (ठाकरवाडी), मेघा राजपूत (चिंचोली मराठी), संस्कृती शेळके (धनगरवाडी).
१०० मीटर धावणे - मोठा गट (इयत्ता पाचवी ते आठवी) - सचित्रा हिले (पिंपळगाव जोगा), किरण बनवासी (आळेफाटा), काजल काळे (आनंदवाडी).
५० मीटर धावणे - लहान गट (इयत्ता तिसरी ते चौथी) - रागिणी पवार (हिवरे खुर्द), हिंदवी लांडे (तेजेवाडी), रंजना चव्हाण (नगदवाडी).
बेडूक उडी - लहान गट (इयत्ता पहिली ते दुसरी) - दिशा येलमार (रामोसवाडी), रविना काळे (रामवाडी), अनुष्का भले (आंबेदरा).
लिंबू चमचा - लहान गट (इयत्ता पहिली ते दुसरी) - तेजस्विनी दप्तरे (आलदरे), खुशी थोरात (मांजरवाडी), स्नेहल जाधव (ठाकरवाडी खानगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com