जुन्नर शहर परिसरात आदरांजली

जुन्नर शहर परिसरात आदरांजली

Published on

जुन्नर ता. २९ : जुन्नर शहर व पंचक्रोशीत नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह अन्यत्र सर्व ठिकाणी दुकानदारांकडून उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवत अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.
अजित पवार यांच्या मृत्यूमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त करत उत्स्फूर्तपणे बंद पाळला. व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. अत्यावश्यक सुविधांमधील दवाखाने, बँका, मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहरातील रस्त्यावर देखील तुरळक प्रमाणात गर्दी दिसत होती.
महाराष्ट्र सरकारकडून अजित पवार यांच्या निधनाबद्दल शासकीय दुखवटा पाळण्याच्या सूचना मिळाल्यानंतर शहरातील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, महाविद्यालय, शासकीय कार्यालये यामध्ये देखील सुमारे बाराच्या सुमारास उपमुख्यमंत्री पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहरासह जुन्नरच्या पश्चिम भागात देखील व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. पंचक्रोशीतील सावरगाव, आगर, कुसूर, पारुंडे, वडज, येणेरे, निरगुडे, आपटाळे, सुराळे, पाडळी, बारव या गावामध्ये देखील व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

03138

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com