शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई

शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई

Published on

शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई
जुन्नर, ता. ५ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अभिलेखावरील आरोपी अखलाक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृह
आरोपी शेख रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नर पोलिस ठाण्याकडून देण्यात आली.
याबाबत पोलिस ठाण्याकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की, पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपी, आरोपींची टोळी यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार जुन्नर पोलिस ठाणे अभिलेखावरील असलेला सराईत आरोपी अकलाक आसिफ शेख (रा. कागदीवाडा जुन्नर ता. जुन्नर), याच्यावर महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट), वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणाऱ्या आणि अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत असलेल्या कलमानुसार शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह अकोला जि. अकोला येथे करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शंभरहून अधिक आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी देखील जुन्नर पोलिस ठाण्याकडून सोयाबिन चोरीने संपूर्ण जुन्नर तालुक्यात धुडगुस घालणारी सुनील मोहन काळे, वय. २६ वर्षे, रा. तलाखी, कुसुर, ता. जुन्नर जि. पुणे. (टोळी प्रमुख) व त्याचे इतर चार साथीदारांच्या टोळीला दोन वर्षांकरिता पुणे, ठाणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जुन्नर शहरात गोवंश वाहतूक व कत्तल करणारे आरोपी नाजीम रज्जाक बेपारी व फारूक अब्बास कुरेशी यांना संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केले आहे. यासोबतच शहरातील सूरज जयसिंग परदेशी याला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com