शिवभक्तांना जाणवली अजितदादांची उणीव

शिवभक्तांना जाणवली
अजितदादांची उणीव
Published on

जुन्नर, ता. १९ : छत्रपती शिवरायांचा शिवजन्म सोहळा किल्ले शिवनेरी येथे उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांसह विविध मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. मात्र, या सोहळ्यांमध्ये किल्ले शिवनेरीच्या विकासामध्ये ज्यांचे मोलाचे योगदान राहिले, ज्यांच्या प्रयत्नातून किल्ले शिवनेरीच्या परिसर विकासाचा आराखडा मंजूर झाला, किल्ले शिवनेरी एक मॉडेल फोर्ट करून पुढच्या पिढ्यांना एक आदर्श व अभिमानाची ठेव ठेवावी अशी भावना जपणारे, गेल्या कित्येक वर्षांपासून किल्ले शिवनेरी व परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली ते दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थितीची जाणीव मान्यवरांसोबतच उपस्थित शिवभक्तांना झाल्याचे प्रकर्षाने जाणून आले. अजित पवार यांच्या किल्ले शिवनेरी, तसेच जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी असलेल्या मोलाच्या योगदानाची आठवण उपस्थितांकडून करून देण्यात येत होती. स्व. अजित पवार यांच्याशिवाय हा सोहळा होतोय, अशी कल्पना स्वप्नातसुद्धा मान्य होत नाही, अशी भावना बहुतांशी शिवभक्तांकडून व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com