जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वाघेश्वर अव्वल

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वाघेश्वर अव्वल

Published on

जुन्नर, ता. २२ : शिवजयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत चऱ्होलीच्या वाघेश्वर क्रीडा संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला. आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील २२ नामवंत संघांनी सहभाग नोंदवला होता.
आमदार शरद सोनवणे, सीमा सोनवणे, तहसीलदार डॉ. सुनील शेळके, संतोष चव्हाण, अविनाश कर्डिले, मंगेश काकडे, अक्षदा मांडे, सचिन वाळुंज, दर्शन फुलपगार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १७) स्पर्धेचे उद्घाटन झाले. हजारो कबड्डीप्रेमींनी या सामन्यांचा आनंद लुटला. सर्व विजेत्या संघांना व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धांचे नियोजन राजन वाबळे, जिल्हा क्रीडाशिक्षक जालिंदर ढमाले, प्रभाकर मिंढे, अमोल शिंदे, संतोष मुसळे, संजय मोधे, प्रदीप भोर यांनी केले तर पंच प्रमुख म्हणून अनिल यादव यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल (गाव)
द्वितीय - राकेशभाऊ घुले संघ (बोपखेल), तृतीय - कमलजादेवी मंडळ (कळंब), चतुर्थ - ओमसाई संघ (वडगाव सहानी). पाचव्या ते आठव्या क्रमांकावर अनुक्रमे श्री गणेश संघ (वडगाव सहानी), भैरवनाथ संस्था (भोसरी), मॉडर्न स्पोर्ट्स क्लब (जुन्नर) आणि वाघेश्वर संस्था (चऱ्होली) यांनी बाजी मारली.
वैयक्तिक पारितोषिक
उत्कृष्ट पकड : नावेद सय्यद (मॉडर्न स्पोर्ट्स क्लब), तन्मय वाबळे (कमलजादेवी क्रीडा मंडळ). उत्कृष्ट चढाई : रवी सुराशे (ओम साई कबड्डी संघ), ओमकार मंजुळे (श्री गणेश क्रीडा मंडळ). मैदानाचा राजा : ओंकार शिंदे (वाघेश्वर क्रीडा संस्था ), चैतन्य राठोड (राकेशभाऊ घुले संघ बोपखेल).

Marathi News Esakal
www.esakal.com