शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती सोहळा
जुन्नर, ता. ६ : ‘‘छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरी हे प्रेरणास्थान आहे. प्रत्येकाने भीतीचे व आळसपणाचे सावट झटकून या पवित्र मातीला वंदन करून प्रेरणा घेऊन वाटचाल करावी. छत्रपती शिवरायांनी स्वतःसाठी राज्याभिषेक केला नाही. ते स्वतः एक योगी म्हणून सिद्ध होते,’’ असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे तिथीनुसार शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी आयोजित केलेल्या सभेत खासदार डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. याप्रसंगी शिवशंकर राजेंद्र स्वामी, व्याख्याते सुधीर गाडे, नगराध्यक्षा सुजाता काजळे, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे, चिटणीस रमेश कर्पे, चंद्रहास श्रोत्री, संदीप धानापुने, गोविंद हिंगे यांसह मोठ्या संख्येने शिवभक्त व व्रतधारी उपस्थित होते.
दरम्यान, तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने सकाळी सात वाजता शिवशंकर राजेंद्र स्वामी यांच्या हस्ते गडदेवता शिवाई मातेस अभिषेक करण्यात आला. यावेळी शिवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र भगत, बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजने, सरपंच दत्तात्रेय ताजणे यांसह ग्रामस्थांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर श्री शिवाई माता मंदिर ते शिवजन्मस्थळ छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. शिवजन्मस्थळावर मान्यवरांच्या हस्ते पाळणा जोजवून शिवजन्मसोहळा साजरा करण्यात आला. सकाळी शिवव्याख्याते सुधीर गाडे यांनी गडावर शिवव्याख्यान दिले. कबाडवाडी येथील महिला गटाने लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. पाडळी येथील शौर्य पथकाने सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

