वणवा लावणाऱ्या दोघांना अटक

वणवा लावणाऱ्या दोघांना अटक

Published on

जुन्नर, ता. ८ : तालुक्यातील खामगाव येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावणाऱ्या दोन युवकांना वनविभागाने अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. करण हरीभाऊ पारधी आणि अक्षय संतोष जाधव अशी आरोपींची नावे असून, फरार अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
खामगाव हद्दीतील बनकक्ष क्र. ८४ मध्ये शनिवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. वनपाल कृष्णा दिघे, वनरक्षक स्वरूप रेंगडे आणि कीर्ती चिचमलकर गस्तीवर असताना त्यांना काही तरुण वणवा लावताना दिसले. वनविभागाच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून दोघांना पकडले, तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या आगीत वनसंपदेसह वन्यजीवांच्या अधिवासाचे मोठे नुकसान झाले आहे.
वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई
जुन्नर वनविभागाच्या हद्दीत वणवे रोखण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. वणवा लावणे हा अजामीनपात्र गुन्हा असून, यात दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. नागरिकांनी वणवा लावणाऱ्यांची माहिती दिल्यास त्यांना बक्षीस दिले जाईल आणि नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com