निरगुडे येथे आरोग्य शिबिर

निरगुडे येथे 
आरोग्य शिबिर
Published on

जुन्नर, ता. २५ ः निरगुडे (ता. जुन्नर) येथे हरिनाम सप्ताहानिमित्त डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि श्रीराम देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली. यावेळी पोर्टएस्कॅप इंडियाच्या सीएसआर निधीतून महिलांच्या स्तन कर्करोगाच्या पूर्व तपासणीसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘आस्था’ उपक्रमांतर्गत १६७ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली. या शिबिरात विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या. माऊली आय केअरच्या माध्यमातून नेत्र तपासणी करून ११७ गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हिंद लॅबमार्फत रक्त तपासण्या, तर दंततज्ज्ञ डॉ. जागृती ताजने यांनी दंत तपासणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे, सचिव डॉ. एफ. बी. आतार, डॉ. दयानंद गायकवाड, डॉ. अशितोष बोळीज, डॉ. जागृती ताजने, नेत्रतज्ज्ञ विकास बोंद्रे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com