बावड्यातील बाह्यवळण मार्गाचे काम अपूर्ण
बावडा, ता. ३ ः संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या वकील वस्ती ते सराटीपर्यंत बाह्यवळण रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने येथील व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.
या पालखी महामार्गाचे काम जवळपास तीन- चार वर्षांपासून सुरू आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी येण्यापुरतेच या रस्त्याचे काम चालू होते व नंतर हे काम बंद केले जाते. त्यामुळे काम पूर्ण होत नाही. उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने वकील वस्ती येथील सेवा रस्त्याने जाताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे अपघात होत आहेत.
बावडा- अकलूज मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीचे अपघात होत आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने रस्ता दुरुस्तीच करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
वकीलवस्ती येथील उड्डाणपुलाचे काम देखील अपूर्ण आहे. तसेच, रस्त्याचे, गटार वाहिनीचे काम अपूर्ण असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, उड्डाणपुलावर असलेले पथदिवे देखील बंद आहेत.
सुरवड ते वकीलवस्तीपर्यंत पालखी महामार्गाचे काम काही प्रमाणात झाले आहे, तर काही ठिकाणी काम अपूर्ण आहे. वकील वस्ती ते सुरवड पर्यंतच्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेवा रस्ता नसल्याने वाहनांना चढउतार करणे अवघड झाले आहे.
रस्ता तयार करण्याअगोदर रचना सांगितली असती तर आमचे या रस्त्यामध्ये क्षेत्र मोठ्या प्रमाणात जाते की नाही जाते हे कळाले असते. मात्र, आम्हाला पूर्वसूचना न दिल्यामुळे आमचे मोठे क्षेत्र या रस्त्यामध्ये गेले आहे. यासाठी आम्ही आंदोलने केली आहेत, मात्र आहे असाच रस्ता चालू आहे.
- पांडुरंग बनसोडे, रमेश कोरटकर
00910, 00911
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

