बावड्यात योग शिबिराद्वारे निरोगी जीवनशैलीचा संदेश

बावड्यात योग शिबिराद्वारे 
निरोगी जीवनशैलीचा संदेश
Published on

बावडा, ता. १० : बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात आयोजित एकदिवसीय योग शिबिरात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित भारत स्वाभिमान पतंजली योग समितीच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते.
स्वामी परमार्थदेव जी (मुख्य केंद्रीय प्रभारी, पतंजली योगपीठ) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पतंजली योग समिती, युवा भारत आणि किसान सेवा समितीच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या उपक्रमाचा प्रसार करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com