
आंदगावात भरली आंबा लागवडीची पाठशाला
भुकूम, ता. २८ : आंदगाव (ता. मुळशी) येथे शेतकऱ्यांसाठी आंबा लागवडीसाठीची पाठशाळा आयोजित केली होती. यामध्ये आंब्याची फळबाग व त्यापासून निश्चित व चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. खोडवच्या टेपावर मुळशी तालुका शेतकरी संघ व महादेश फार्म्स कंपनीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मुठा खोरे व रिहे खोऱ्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी कंपनीचे संचालक सचिन कुलकर्णी म्हणाले, मुळशी तालुक्यात पावसाळ्या पूर्वी लागवड केल्यास आंब्यांच्या झाडांची मुळे भक्कम होतील व पावसाच्या पाण्याचा धोका होणार नाही. पाण्याची सोय असल्यास तुम्ही कोणत्याही दिवसात झाडे लावू शकता.
दरम्यान, केशर आंब्याच्या झाडांची लागवड करावी, असे संग्राम माने यांनी सांगितले. पाठशाळेस रमेश मोगल, विष्णू शिंदे, दगडूजी मारणे, अंकुश मारणे, आबा मारणे, नागेश मारणे, दत्तात्रेय उभे, स्वप्नील मारणे, सुरेश मारणे, प्रमोद शिंदे, अशोक मारणे, सचिन घारे उपस्थित होते. यावेळी शेतकरी राजेंद्र मारणे यांच्या शेतात चारशे केशर आंब्याची लागवड करण्यात आली.
01584