घोटवडे येथे शासन आपल्या दारी उपक्रम
भुकूम, ता. १६ : ‘‘शासन आपल्या दारी योजनेतून सामान्य माणसांपर्यंत विविध योजना पोहोचत आहे. त्याचा प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. आगामी काळात तालुका पातळीवर सर्व शासकीय कमिट्यांची नेमणूक केली जाईल.’’ असे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले.
घोटावडे (ता. मुळशी) येथे महसूल खात्याच्यावतीने शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, सरपंच सारिका खानेकर, उपसरपंच संतोष गोडांबे, सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर, बाबाजी शेळके, कांता पांढरे, राजाभाऊ शेळके, भीमाजी केसवड, रामचंद्र देवकर, हनुमंत घोगरे, विठ्ठलराव गोडांबे, छबनराव, ज्ञानेश्वर डफळ उपस्थित होते. सूत्रसंचालन साहेबराव भेगडे यांनी केले.
या वेळी तहसीलदार भोसले म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची कामे सहज व्हावी म्हणून हा उपक्रम आहे. ग्रामस्थांना एखाद्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी सतत हेलपाटे घालायला लागू नये हा उपक्रमाचा हेतू आहे.’’ तर
महसूल विभागाच्या कामासाठी तहसील कार्यालयात आल्यावर संकोच न बाळगता भेटण्याचे आवाहनही भोसले यांनी केले. या वेळी वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बाबाजी शेळके यांनी शेतकरी वारीला गेल्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा घ्यावा अशी मागणी केली. याप्रसंगी ग्रामस्थांना रेशनिंग कार्ड वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

