

भुकूम, ता. ३ : मुळशी तालुक्यात शहरीकरण तसेच पश्चिम भागातील ग्रामस्थ शहरातून स्थायिक झाल्यामुळे बैलांची संख्या कमी झाली. जमिनी विकल्यामुळे शेती कमी झाली, यांत्रिकीकरण झाले त्यामुळे बैलं गेली अनं पोळाही गेला अशी परिस्थिती तालुक्यात झाली आहे. तालुक्यात पिरंगुट, हिंजवडी येथे कारखानदारी आली. लवासा, सहारासारखे अनेक छोटे मोठे प्रकल्प आले. अनेक गृह प्रकल्प पूर्व उभे राहिले. त्यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला. परिणामी मुळशीतील मूळ शेतीचा पॅटर्न बदलून ग्रामीण बाज हरपला.
तालुक्यात पूर्वी गावोगावी ग्रामस्थ स्थायिक होते. भात शेती व त्यानंतर काठाणाची पिके घेत होते. शेतातील मशागतीसाठी बैलांच्या साह्याने औतकाठी घरोघरी होती. गाई, म्हशी दूध दुभत्यासाठी होत्या. एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे भाद्रपद आमवस्येला बैल पोळ्याचा सण घरोघरी साजरा केला जात होता. गावठाण, गावाच्या वाड्या वस्त्यातून शेतकरी सकाळपासून बैलांना नदीवर आंघोळ घालून बेगाड लावून, झुली घालून सजवत असतं. पुरण पोळीचा नैवेद्य देत होते. बैलांची मिरवणूक गावातून ढोल लेझीम निनादात काढत असे. दरम्यान तालुक्यातील आता परिस्थितीत बदल झाला आहे. गावातील बैलं गेली व पोळाही गेला अशी परिस्थिती झाली आहे.
तरुण पिढीची शहराला पसंती
तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामस्थ, तरुण पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी, व्यावसायासाठी स्थायिक झाली. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली. त्यामुळे उपलब्ध शेतीमध्ये अर्थकारण जमत नव्हते. पुढील पिढीसाठी शिक्षणाच्या पुरेशा सोई तालुक्यात,गावोगावी नव्हत्या. त्यामुळे तरुण पिढी शहरात स्थायिक झाली अनं गावं ओस पडली.
जमीन विक्री
तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून जमीन विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. शेतकऱ्यांनी शेती, डोंगर राने विकली. त्यात जमीन एजंटांनी मोठी भूमिका घेतली. सध्या गावोगावच्या जमिनी विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेती कमी झाली.
यांत्रिकीकरण
शेतीमध्ये ट्रॅक्टर, रोटर, जेसीबी यंत्रे आली. त्यामुळे कमी वेळात व कमी खर्चात चांगली मशागत खाचरातून होऊ लागली. अनेक शेतकरी यंत्रे घेऊन कामे करून द्यायचा व्यवसाय करू लागले. त्यामुळे बैलांची जागा यंत्रणांनी घेतली.
शहरीकरण
शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे पश्चिम भागातील गावे ओस पडली. प्रत्येक गावातील अनेक घरे वर्षांनुवर्षे बंद आहेत. गावातंच माणसं राहिली नाही तरं बैल कुठून येणार. त्यामुळे तालुक्यात पहिल्या सारखा पोळा होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.