

भुकूम, ता. १४ ः धुलिवंदनानिमित्ताने घोटावडे येथे अडीच हजार किलो मटणाची विक्री झाली. खरेदीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून ग्राहकांची गर्दी झाली होती.
येथील शेळकेवाडीत मटणाची पूर्वीपासून दुकाने आहेत. तसेच येथील मटण चवीला प्रसिद्ध आहे. त्यामुळे हिंजवडी, माण, रिहे खोरे, घोटावडेफाटा पर्यंतच्या गावातील ग्रामस्थ मटण खरेदीसाठी येतात. तसेच धूलिवंदनाच्या दिवशी शेतातील कामे बंद असतात. तसेच प्रत्येक गावात फंड असतात. त्यामध्ये गावच्या यात्रेचे नियोजन केले जाते. त्यामुळे होळी व फंडासाठी गावातील शहरात राहणारे ग्रामस्थ उपस्थित असतात. त्यामुळे घरोघरी मांसाहाराचा बेत ठरलेला असतो. त्यामध्ये प्रामुख्याने बकरेचे मटणास पसंती दिली जाते. त्यामुळे दिवसभर गर्दी असते, असे मटण विक्रेते सुजित घोडके यांनी सांगितले.
मटणाची दुकाने नाहीत, त्या गावातील चार ते पाचजण एकत्र येऊन बकरी आणतात. स्वतः कापून विक्री करतात. त्यामुळे ग्रामीण भागात ‘होळीला पोळी व धुळवडीला नळी’ अशी म्हण पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.