

भुकूम, ता. २५ : पंधरा दिवसांपासून सलग जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे यावर्षी भात पेरण्या कशा करायच्या? या प्रश्नामुळे मुळशीतील शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
दरवर्षी मे महिन्यात वळवाचा पाऊस काही दिवस पडतो. पण सध्या सलग पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाताचे रोपटेच तयार करता आले नाहीत. पाऊस सुरू होण्यापूर्वी धूळवाफ साधण्याकरिता काही शेतकरी पेरणी करत. पण ते यंदा शक्य झाले नाही. सततच्या पावसामुळे ओढ्यांना पाणी येऊन खलाटीच्या शिवारात उपळे फुटले आहेत. खाचरे तुंबली आहेत. शेतकऱ्यांनी पेडीची नांगरणी करता आली नाही.
शेतकरी नांगरणी करून भात रोपटे तयार करीत असतात, असे कोळावडे येथील शेतकरी तुकाराम मरे यांनी सांगितले. शेतकरी सात जूनपर्यंत पेरणी करतात. दरम्यान, अद्याप पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने पाच जूनपर्यंत पूर्व मोसमी पाऊस सांगितला आहे. तसेच मॉन्सून दोन दिवसात राज्यात दाखल होत आहे. त्यामुळे पावसाची उघडीप मिळेल असे वाटत नाही. यावर्षी पेरणी, खणणी करून भाताचे उत्पादन मिळणार की नाही याची अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पावसामुळे शेतीच्या कामाचे वेळापत्रक बिघडले आहे. कोणतीच कामे शेतात करता येत नाहीत. किमान दोन आठवडे पाऊस चांगला उघडण्याची गरज आहे.
- रामदास आंग्रे, भुकूम
02531
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.