आदर्श विद्या मंदिरचे २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श विद्या मंदिरचे
२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
आदर्श विद्या मंदिरचे २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

आदर्श विद्या मंदिरचे २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

sakal_logo
By

भिगवण, ता. १६ ः येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्या मंदिरमधील दोन विद्यार्थी शिष्यवृती परिक्षेत गुणवत्ता यादी आले आहेत. दोन सख्या भाऊ बहिणीने शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पूर्व प्राथमिक विभागातून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पंधरा विद्यार्थी बसले होते. त्यातील चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सिद्धराज सतीश हगारे हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकला आहे. माध्यमिक विभागातून २० विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी समृद्धी सतीश हगारे ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आली आहे. विद्यार्थ्यांना हेमलता नलवडे व दीपाली लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे, अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुचेता साळुंखे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पल्लवी वाघ यांनी अभिनंदन केले.